वृत्तसंस्था/ सिडनी
येत्या डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱया 10 व्या बिग बॅश टी-20 क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा यष्टीरक्षक आणि फलंदाज जॉनी बेअरस्टोचे पदार्पण होणार आहे. या स्पर्धेसाठी बेअरस्टोने मेलबोर्न स्टार्स संघाबरोबर करार केला आहे.
सदर स्पर्धा 10 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणार आहेत पण 31 वर्षीय बेअरस्टो नाताळ सणानंतरच या स्पर्धेत सहभागी होणार आहे. मेलबोर्न स्टार्स संघामध्ये ग्लेन मॅक्सवेल, स्टोनिस आणि ऍडम झंपा यांचा समावेश आहे. डेव्हिड हस्सी मेलबोर्न स्टार्सचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. बेअरस्टोने आतापर्यंत 70 कसोटी, 83 वनडे आणि 43 टी-20 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले असू
न संयुक्त अरब अमिरातमधील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत तो सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून खेळत होता.