बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरातील हद्दीतील संध्या किरण वृद्धाश्रम आणि पुनर्वसन केंद्रात कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया हिने सोमवारी आत्महत्या केल्याची घटना घडली.
अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पण तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे बोलले जात होते.
बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील मदनयकनहळ्ळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्रीच्या निकटवर्तीयांनुसार तिला नैराश्याने ग्रासले होते आणि पुनर्वसन केंद्रात उपचार घेत होती असे सांगण्यात आले आहे.
‘बिग बॉस’ मध्ये प्रसिद्धी मिळाल्याने जयश्री एक मॉडेल बनलेली अभिनेत्री होती. तिने २०१७ मध्ये इम्रान सरधारियाच्या ‘अप्पू हुली खारा’ मध्ये अभिनय केला होता.