सौरभ राशिवडे – सचिन शिरगुप्पी यांच्यात प्रमुख लढत
बेळगाव : बिजगर्णी येथे कलमेश्वर फार्मर्स प्रोसेसिंग सोसायटी बिजगर्णी यांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन ब्रम्हलिंग मंदिराच्या मैदानावर करण्यात आले आहे. प्रमुख कुस्ती राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ राशिवडे विरूद्ध राष्ट्रीय चॅम्पियन बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलचा सचिन शिरगुप्पी यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची लढत बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलचा सुनील बेटगेरी वि. शेखर पिरनवाडी, तिसऱया क्रमांकाची कुस्ती राशिवडेचा राजु डागेकर वि. किसन पिरनवाडी, चौथ्या क्रमांकाची कुस्ती पंकज चापगाव स्पोर्ट्स हॉस्टेल वि. सुजित राशिवडे, पाचव्या क्रमांकाची कुस्ती रूपेश कर्ले वि. विक्रम गावडे तुर्केवाडी, सहाव्या क्रमांकाची कुस्ती ज्ञानेश्वर तुर्केवाडी वि. सुदर्शन राशिवडे, सातव्या क्रमांकाची कुस्ती धोंधरे राशिवडे वि. महेश तिर्थकुंडे यांच्यात होणार आहे. याशिवाय लहान मोठय़ा 25 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्तीला चालना देण्यासाठी बिजगर्णीत 25 वर्षानंतर मोनाप्पा भास्कर यांच्या प्रयत्नाने यावषी शिवरात्रीनिमित्त या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.