प्रतिनिधी/ बेळगाव
जमीन वादातून बिजगर्णी (ता. बेळगाव) येथे रविवारी भाऊबंधांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. या हाणामारीत सात जण जखमी झाले असून या संबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात परस्परांविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
एका गटाचे चार, दुसऱया गटाचे तीन असे एकूण सात जण जखमी झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. रुक्मण्णा सुबराव अष्टेकर व अनंत पुंडलिक अष्टेकर यांनी परस्परांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.