प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजीवडा येथे आरोग्यसेविकांची अडवणूक करणाऱया माजी नगरसेवक बिजली खानला शनिवारी शहर पोलीस ठाण्यात जामीन मंजूर करण्यात आल़ा यावेळी खान याला पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असून दर 7 दिवसांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली आह़े
शहरातील राजीवडा येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आह़े शनिवारी सकाळी या परिसरात गेलेल्या आरोग्यसेविकांना माजी नगरसेवक बिजली खान याने अडवणूक केल़ी तुम्हाला या ठिकाणी सर्वे करता येणार नाही, तुम्ही येथून निघून जा, अशी धमकी खान याने आरोग्यसेविकांना दिल़ी राजीवडा परिसरात या घटनेमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होत़ी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी घटनास्थळी दाखल होवून परिस्थिती नियंत्रणात आणल़ी तसेच बिजली खानला ताब्यात घेण्यात आले होत़े शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, बिजली खानविरूद्ध भादंवि कलम 341, 186, 188, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा हा गुन्हा जामीनपात्र असल्याने बिजली खानला शहर पोलीस ठाण्यात जामीन मंजूर करण्यात आल़ा