वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्योगांची स्थिती नाजूक असताना नोकरभरतीत बिटस् पिलानीच्या उमेदवारांना उत्तम वेतनाच्या ऑफर्स आल्याचे सांगण्यात येत आहे. एका कंपनीने पिलानी संस्थेतील उमेदवाराला 45 लाख रुपये वार्षिक वेतनाची ऑफर दिली असून सरासरी 26 लाखाचे पॅकेजही उमेदवारांना मिळू शकले आहे.
बिटस् पिलानीच्या 2021 साठीच्या पूर्वभरती प्रक्रियेत विविध कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मायक्रोसॉफ्ट वॉलमार्ट, ऍमेझॉन, गोल्डमॅन सॅच, ओरॅकल, ऍडोब आणि इतर भारतीय कंपन्या जशा की हिंदुस्थान युनिलिव्हर, फ्लिपकार्ट आदींनी यात भाग घेतला होता. संस्थेतील अभियांत्रिकी पदवीधराला वार्षिक 45 लाखाची ऑफर मिळाली आहे. 2020 च्या तुलनेत ही वाढ 22 टक्के अधिक असल्याचे संस्थेने म्हटले आहे. 2020 मध्ये 211 ऑफर्स आल्या होत्या, त्यातुलनेत 2021 साठीच्या भरतीकरीता 259 ऑफर्स आल्या आहेत.