2 कोटीच्या निधीतून इमारत बांधकामाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ
वार्ताहर /चापगाव
खानापूर तालुक्मयात विकासकामांबरोबर शैक्षणिक विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तालुक्मयातील शैक्षणिक धोरण सुधारावे. अंगणवाडीपासून महाविद्यालयापर्यंत सरकारी इमारती उत्कृष्ट दर्जाच्या व्हाव्यात, यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत. बिडी याठिकाणी पदवी महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी स्वतःची इमारत व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न आहेत. जागेचा असलेला प्रश्न निकालात झाल्यामुळे यालाही आता मुभा मिळाली आहे. यापूर्वी दोन कोटीचा निधी या इमारतीच्या बांधकामासाठी मंजूर झाला होता. सदर निधी गदग जिह्यात जाणार होता. यासाठी विशेष प्रयत्न करून तो पुन्हा या ठिकाणी महाविद्यालयाच्या इमारतीसाठी आणण्यात आपणाला यश आले आहे. त्यामुळेच या निधीतून बिडी येथील महाविद्यालयाच्या इमारतीचे कामकाज पूर्णत्वाला येणार आहे, असे विचार आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले. सोमवारी बिडी येथे महाविद्यालयासाठी मंजूर झालेल्या जागेवरच भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी कॉलेजच्या प्राचार्या विद्या जिरगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कॉलेजच्या शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. कार्यक्रमात भूमिपूजन, पायाखोदाई आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्या हस्ते काही महिला प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला.
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न हाती घेऊन तालुक्मयासाठी मंजूर झालेला निधी या ठिकाणीच कायम ठेवावा अशी विनंती सरकारकडे केली होती. त्यानुसार सदर जागेचा प्रश्न तात्काळ निकाली होताच या इमारतीच्या बांधकामालाही आता प्रारंभ झाल्याने या भागातील शालेय विद्यार्थी तसेच पालकवर्गातून तसेच नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
या मंजूर निधीतून चार एकर जागेपैकी दहा हजार चौरस फूटमध्ये सदर इमारत उभारली जाणार आहे. आराखडय़ानुसार पाच वर्गखोल्या, एक प्राचार्य कोठडी, एक ऑफिस कोठडी व 1 स्टाफ कोठडी अशा एकूण आठ खोल्या व इतर सुविधा बांधण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अधिकारी हलगी यांनी दिली. याप्रसंगी डॉ. बी. सी. पुजार, माजी प्राचार्य डॉ. आर. जे. कट्टी, विद्यमान प्राचार्य डॉ. विद्या जिरगे, डॉ. जवळी, सर्व प्राध्यापक, बिडी पंचायतचे सदस्य, तसेच ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मधू कवळेकर, गीता अंबडगट्टी, इसाक टेगडी, फ्रान्सिस सेराव केतान व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.