दिवंगत भाजप नेते कल्याणसिंग, शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचाही पद्मविभूषणने गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. काही काळापूर्वी हेलिकॉप्टर अपघातात दिवंगत झालेले भारताचे प्रथम सेनानी सीडीएस जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यंदा एकंदर 128 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात दोन दुहेरी पुरस्कारही आहेत. एकंदर 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या थोर गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला असून बालाजी तांबे यांना मरणोपरांत पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
गोव्यातील सद्गुरु ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी यांना अध्यात्म क्षेत्रात, तर ब्रम्हानंद शंखवाळकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अशा प्रकारे गोव्यातील दोन मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे.
पद्मविभूषण
प्रभा अत्रे, बिपीन रावत, राधेश्याम खेमका (मरणोपरांत), कल्याणसिंग (मरणोपरांत)
पद्मभूषण
गुलाम नबी आझाद, व्हिक्टर बॅनर्जी, गुमित बावा (मरणोत्तर) बुद्धदेव भट्टाचार्यजी, नटराजन चंद्रशेखर, कृष्णा इला आणि सुचित्रा इला, मधुर जाफरी, देवेंद्र झाझरीया, रशिद खान, राजीव मेहर्षी, सत्य नाडेला, सुंदर पिचाई, सायरस पुनावाला, संजय राजाराम (मरणोत्तर) प्रतिभा रे, स्वामी सच्चिदानंद, वशिष्ट त्रिपाठी.
पद्मश्री
प्रल्हाद राय अगरवाला, नजमा अख्तर, सुमित अंतिल, टी. सेनाकाव, कमलिनी अस्थाना आणि नलिनी अस्थाना, सुबण्णा अयप्पन, जे. के. बजाज, सिर्पी सुब्रम्हणीयम, श्री बाबा बलिया, संघमित्रा बंडोपाध्याय, माधुरी भरतवाल, अकोने बशरत, हिम्मराव बावस्कर, हरमोहिंदर सिंग बेदी, प्रमोद भगत, एस. भल्लेश बजंत्री, खांडू वांगचुक भुतिया, मारिया ब्रिष्टी, आचार्य चंदनजी, सुलोचना चव्हाण, नीरज चोप्रा, शंकुतला चौधरी, शंकर नारायण मेनन, एस. दामोदरन, फैझल अली दर, जगजितसिंग दर्दी, प्रोकार दासगुप्ता, आदित्यप्रसाद दास, लता देसाई,
मालजीभाई देसाई, वसंतीदेवी, नोरेन बाम बिनोदेवी, गुप्तमणि देवी, श्याममणी देवी, खलील धनतेजवी, सावजीभाई ढोककिया, अर्जुनसिंग धुर्वे, विजयकुमार डोंगरे, चंद्रप्रकाश द्विवेदी, धनेश्वर एंगटी, ओमप्रकाश गांधी, नरसिंहराव गरीपकती, गिरीधारी राम घोंजू, शैबल गुप्ता, नरसिंग प्रसाद गुरु, गोसावेलू शेख हसन, रायकू हिरा, सोसम्मा, अवधकिशोर जालिया, सावकार जानकी, तारा जोहार, वंदना कटारिया, एच. आर. केशवमूर्ती, नारायण कुरुप, अवली लेकरा, मोतीलाल मदन, सिवांत मित्रा, नरेंद्र प्रसाद मिश्रा, दर्शनाम मोगिल्ला, थविल मुरुगयन, आर. एम. मुथुकणमल, अब्दुल खादर, अमाई नाईक, सेरिंग नामग्याल, बालाजी तांबे