सुधाकर काशीद / कोल्हापूर
बिबट्याच्या तोंडाला एकदा माणसाचे रक्त लागले की, तो नरभक्षक होतो असे नाही. त्यामुळे शिराळ्यात तडवळे येथे येथे एका बालकावर हल्ला केलेला बिबटÎा नरभक्षक झाला आहे ही चर्चा खरी नाही . असे मुख्य वनसंरक्षक अधिकारीक्लेमेंट बेन यांनी आज तरुण भारतशी बोलताना सांगितले. गेले दोन तीन दिवस नरभक्षक बिबटÎा अशी चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.
ज्या बिबटÎाने ऊसतोड मजुराच्या सुप्रियान या एक वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार मारले त्या बिबट्याचा मग वन खाते काढत आहे. तो बिबट्या मादी असून त्याची दोन पिल्ले त्याच्या सोबत आहेत. त्याचा वावर त्याच परिसरात असल्याने तेथे वन विभागाने पिंजरा लावला आहे. तसेचसकाळी लवकर व रात्रीच्या वेळी या परिसरात एकटा दुकटा व्यक्तीने जाऊ नये असे आवाहनही श्री बेन यांनी केले आहे
ते म्हणाले, शिराळा भागात बिबट्याचा पूर्वीपासून वावर आहे. कुत्रे बिबट्याला सहज मिळणारे भक्ष्य आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर वाडÎवस्ती जवळ असतो कारण तेथे त्याला कुत्र्यासारखे खाद्य सहज मिळते. या तडवळे परिसरात हा बिबट्या होता. त्याची चाहूल यापूर्वीही लागली होती. त्यामुळे नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण दुर्दैवाने एका बालकावर बिबट्याने हल्ला केला व त्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले आहेत. पण या बिबट्या सोबत त्याची दोन पिली आहेत. त्यामुळे बिबट्या सापडला तर त्याच्या पिला नाही पकडून त्या सर्वांना एकत्रित पुन्हा अन्यत्र सोडावे लागणार आहे.
या परिसरात जेथे बिबट्याच्या वावराच्या खुणा आहेत तेथे इन्फ्रारेड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेर्याची वैशिष्ट्य अशी की त्याचा फ्लॅश पडत नाही. पण तरीही रात्रीच्या वेळी जंगलातील वन्यप्राण्यांच्या हालचाली त्यात टिपल्या जातात व कॅमेयाचा रात्री फ्लॅश पडत नसल्यामुळे वन्य प्राणी त्याच्या समोरुन जाताना विचलित होत नाहीत.