श्रीशैल जगद्गुरुही बाधित
प्रतिनिधी / बेळगाव
येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (बिम्स) मधील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वामीजी येडूर (ता. चिकोडी) येथील मठात आयसोलेशनमध्ये आहेत.
बिम्समध्ये एमबीबीएस पहिल्या व दुसऱया वर्षात शिक्षण घेणाऱया 16 विद्यार्थ्यांचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे असणाऱयांना याच इस्पितळात दाखल करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांना बिम्स प्रशासनाने घरी पाठविल्याची माहिती मिळाली आहे.
परीक्षा संपल्याने वसतिगृहातील बहुतेक विद्यार्थी गावी गेले आहेत. परराज्यांतील काही विद्यार्थी अद्याप वसतिगृहात होते. तपासणीअंती 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. उपलब्ध माहितीनुसार बहुतेक बाधितांना घरी पाठविण्यात आले आहे.
माजी खासदार अमरसिंग पाटीलही बाधित
श्रीशैल जगद्गुरुंचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून माजी खासदार अमरसिंग पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
बिम्समध्ये रुग्णसंख्या वाढती
उपचारासाठी बिम्समध्ये दाखल होणाऱया कोरोना बाधितांची संख्या वाढती आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास बिम्समधील व्यवस्था कोलमडण्याचा धोका आहे. गेल्या वषीही तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी तेथील अधिकाऱयांची बैठक घेऊन व्यवस्था वाढविण्याची सूचना केली आहे.