कोविड फ्रंट लाईन्स वर्कर्सचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
बेळगाव : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत आम्ही बिम्समध्ये प्रशिक्षण घेतले आहे. वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर हे शिक्षण घेऊन कोरोना काळात आम्ही रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत केली. तेव्हा आता आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी कोविड-फ्रंट लाईन वर्कर्सनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नर्सिंग तसेच लॅब टेक्निशियन्स पदवी घेतल्यानंतर प्रधानमंत्री कौशल्य योजनेंतर्गत आम्हाला प्रशिक्षण दिले. कोरोना काळात आम्ही सेवा बजावली पण सध्या काम नाही. त्यामुळे बेरोजगार असून आम्हाला काम द्यावे, अशी मागणी या कर्मचाऱयांनी केली आहे.