आमदार अनिल बेनके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बिम्स हॉस्पिटलला 50 लाख अतिरिक्त अनुदान द्यावे, यासाठी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ते देण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याला दोन हप्त्यात हे अनुदान मंजूर करण्याचे ठोस आश्वासन यावेळी दिले. बेळगाव हा मोठा जिल्हा आहे, त्यामुळे अनुदान दिलेच पाहिजे. बिम्समध्ये गोरगरिबांवर उपचार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगून अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आमदार बेनके यांनी प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिस्वास व बिम्सचे वैद्यकीय संचालक कुलकर्णी यांच्याशीही चर्चा करून बिम्सचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.