प्रतिनिधी/ बेळगाव
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन बिम्स्मध्येही (बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था) स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर तपासण्या सुरु असल्याची माहिती बिम्स्च्या सुत्रांनी दिली.
सध्या आयसीएमआरमध्ये स्वॅब तपासणी सुरु आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी जिह्यातील अधिकाऱयांच्या बैठकीत बिम्स्मध्येही स्वॅब तपासणी करण्याची सूचना केली होती. त्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे.
बेळगाव जिह्यातील संशयितांची स्वॅब तपासणी आयसीएमआरमध्ये सुरु आहे. शनिवारी व रविवारी दोन दिवस येथे तपासणी बंद होत्या. त्यामुळे प्रलंबित स्वॅबची संख्या वाढली आहे. सहाजिकच अशा परिस्थितीत एकाच संस्थेवर ताण वाढतो. दोन दिवस तपासणी बंद असल्यामुळे 2 हजार 560 स्वॅब तपासणी प्रलंबित आहे.
जिह्यात 5 हजार 226 हून अधिक जण 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत. निश्चित केलेल्या वेळेनुसार त्यांची स्वॅब तपासणी करावी लागणार आहे. जर आयसीएमआरमधील तपासणी एक दोन दिवस बंद झाली तर प्रलंबित स्वॅबची संख्या वाढते. त्यामुळेच लवकरच बिम्स्मध्येही स्वॅब तपासणी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार प्रायोगिक तत्वावर तपासणी सुरु झाल्या आहेत. यासाठी आयसीएमआरकडून स्वॅब पुरविल्या जातात. प्रायोगिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात होणार आहे. बिम्स्चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश दंडगी यांच्याशी संपर्क साधला असता सध्या प्रायोगिक तत्वावर तपासणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.