प्रतिनिधी / बेळगाव
इंडियन असोसिएशन ऑफ डर्मोटॉलॉजिस्ट, व्हेनेरॉलॉजिस्ट ऍण्ड लेप्रॉलॉजिस्ट (त्वचा, गुप्तरोग व कु÷रोग तज्ञ) असोसिएशनच्या बेळगाव शाखेतर्फे बिम्स हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांसाठी 1 लाखाहून अधिक किमतीची उपकरणे देण्यात आली.
यामध्ये 10 पल्स ऑक्सिमीटर्स, 10 डिजिटल बी. बी. ऍपॅरेटस, 50 ग्लुकोमीटर स्ट्रीप व मशीन, 60 एनआरबीएम मास्क, 10 नेझन कॅनुला, 10 एनआयव्ही मास्क देण्यात आले. असोसिएशनतर्फे डॉ. शिल्पा दास्तीकोप, डॉ. संतोष शिंदे, डॉ. शिवकुमार पाटील, डॉ. सुश्रुत कामोजी, डॉ. भावना जोशी यांनी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले.