कोकरूड/प्रतिनिधी
बिळाशी येथील 27 वर्षीय तरुणीने घरातील लाकडी तुळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याबाबतची वर्दी पोलीस नाईक एम. एस. पांढरे यांनी कोकरूड पोलिसात दिली आहे. याबाबत कोकरूड पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, बिळाशी येतील मधुमालिनी विश्वासराव पाटील (वय 27) या तरुणीने बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील लाकडी तूळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक बी. डी. पवार हे करीत आहेत.