प्रतिनिधी/ मडगाव
बिष्णोई ग्रुपने घरगुती वापरातील ‘नेक्सा’ची उपकरणे गोव्याच्या बाजारपेठेत आणली आहेत. त्यात प्रेशर कुकर, बर्नर गॅस टॉप, ग्लास कुक टॉप, मिक्सर, इस्त्री, गॅस वॉटर हिटर, मॅजिक मोप, नॉन स्टिक कुकवेअर, इत्यादी उपकरणाचा समावेश आहे. या उपकरणासाठी गोव्यातील ग्राहक ऑर्डर देऊ शकतात. बिष्णोई ग्रुप त्याच्या विविध प्रकारच्या दर्जेदार उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे.
ग्राहकाच्या बदलत्या अभिरुचीनुसार आणि ट्रेडशी बिष्णोई ग्रुपने जुळवून घेतल्याने, त्यांची घरगुती उपकरणे एक अधिकार बनले आहेत. बिष्णोई ग्रुपने उत्पादन करताना उपकरणाची पूर्ण काळजी घेतली जाते. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी बिष्णोई ग्रुप सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ग्राहकांच्या यशस्वी पाठींब्याने उत्पादने वाढविण्यावर देखील भर दिलेला आहे.
बिष्णोई ग्रुपने हुबळी, बेंगळुरू आणि गोवा सारख्या शहरांमध्ये आपले काम पसरवले आहे. हुबळीमध्ये तीन सुसज्ज डिझाईन केंद्रांसह प्रादेशिक कार्यालय स्थापन केले. दर्जेदार घरगुती उपकरणांसाठी ग्राहकांनी बिष्णोई ग्रुपशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
गोव्यात मडगाव शहरात बिष्णोई असोसिएटस्, देवराय बिल्डिंग, सेंट सेबेस्तायन चपेल, आकें आल्त-मडगाव येथे भव्य असे दालन असून या ठिकाणी गोव्यातील ग्राहक आपली ऑर्डर नोंदवू शकतात.