ऑनलाईन टीम / पटना :
बिहार राज्याचे मुख्य सचिव अरुण कुमार सिंह यांचे कोरानामुळे निधन झाले. पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिंह यांच्या निधनानंतर बिहार राज्य मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे.
अरुण कुमार सिंह हे 1985 च्या बॅचचे प्रशासकीय सेवेचे अधिकारी होते. दीपक कुमार हे निवृत्त झाल्यावर सिंह यांनी 27 फेब्रुवारी रोजी बिहारच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतली होती.