ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. बिहारमध्ये दिवसभरात 1,265 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 90 हजार 123 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 1,255 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर बिहारमधील एकूण 1,90,123 रुग्णांपैकी आता पर्यंत 1 लाख 77 हजार 929 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 93.59 % आहे. तर आतापर्यंत 925 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 11,268 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 78 लाख 93 हजार 739 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 11 हजार 268 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.