ऑनलाईन टीम / पटना :
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या गरिबांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. नुकताच बिहारमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये भूक भागविण्यासाठी लहान मुले बेडूक खाताना दिसत आहेत.
बिहारमधील जहानाबाद येथील हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओत मुले उपासमारीमुळे बेडूक पकडून ते भाजून खाताना दिसत आहेत. त्यामधील एक मुलगा म्हणतोय, ‘कोरोनामुळे सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केला. हातावर पोट असल्याने पैसे नाहीत, घरात अन्नधान्य शिल्लक नाही. त्यामुळे पोटाची भूक भागविण्यासाठी बेडूक पकडतो. भाजून त्याचे कातडे काढून खातो.’
या व्हिडीओनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका झाली. त्यानंतर या भागात अन्नछत्र सुरू करण्यात आले.