ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या NDA ची आज नितीशकुमार यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत NDA च्या नेत्याची निवड होणार आहे. दुपारी 12.30 वाजता होणाऱ्या या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, बिहारचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत.
NDA च्या विधिमंडळ पक्षांच्या बैठकीपूर्वी NDAमध्ये असलेल्या भाजप, जनता दल युनायटेड, हिंदुस्थानी अवाम मोर्चा, विकास इंसान पार्टी या चार पक्षांची स्वतंत्र बैठक होईल. सर्व पक्षांकडून विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. त्यानंतर NDA च्या नेत्याची निवड केली जाईल.
मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचीच निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे बैठकीनंतर नितीशकुमार राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा करतील, असे सांगण्यात येते.