24 तासात 90 रुग्ण : एकूण संख्या 3275, 16 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ गया
बिहार राज्यामध्ये कोरोनाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे 90 नवीन रुग्ण आढळून आल्याने सरकारची डोकेदुखी भर पडली आहे. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3275 झाल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. दरभंगा जिल्हय़ात प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीच कोरोनाबाधित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी त्यागराजन यांनी दिली.
लखीसराय जिल्हय़ामध्ये शुक्रवारी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या 34 झाली आहे. यामधील आठ जण बरे झाले आहेत. दरभंगामध्ये कोरोनाचे 17 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका सनदी अधिकाऱयाचाही समावेश आहे. तर मधुबनी जिल्हय़ात शुक्रवारी आणखी सात कोरोना संक्रमित आढळून आले असून, आरोग्य विभागाने याला दुजोरा दिला आहे.
बिहारमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये 28 लाख स्थलांतरित कामगार विविध राज्यांमधून परतले आहेत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी सुविधा अपुऱया पडत आहेत. तसेच या कामगारांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करण्यामध्येही अडचणी येत आल्याचे दिसून येत आहे. तरीही प्रशासन प्रयत्न करीत आहे.