ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने 10 हजारचा टप्पा पार केला आहे. बुधवारी राज्यात 88 नव्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची संख्या 10 हजार 76 वर पोहचली आहे, अशी माहिती बिहारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
याआधी मंगळवारी बिहारमध्ये कोरोनामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बिहारमध्ये मृतांची एकूण संख्या 68 वर पोहोचली आहे. तर मंगळवारी 481 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मंगळवारी कोरोना रुग्णांचा आकडा 9,988 इतका झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी झालेल्या 5 मृतांमध्ये रोहतास जिल्ह्यातील दोन, पूर्वी चंपारण, गया आणि नालंदा मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
बिहारमध्ये आतापर्यंत आढळलेल्या 10,076 रुग्णांमध्ये पाटणा मधील 747, भागलपुर 500, मधुबनी 467, बेगूसराय 452, सिवान 419, मुंगेर 365, समस्तीपुर 362, रोहतास 343, कटिहार 348, मुजफ्फरपुर 313, दरभंगा 310, नवादा 308, खगड़िया 304, पूर्णिया 297, गोपालगंज 257, जहानाबाद 252, सुपौल 251, नालंदा 235, बांका 235, औरंगाबाद 232, भोजपुर 230, बक्सर 227, पूर्वी चंपारण 219, सारण 214, गया 213, मधेपुरा 207, पश्चिम चंपारण 208, वैशाली 188, कैमूर 186, सहरसा 178, किशनगंज 170, शेखपुरा 155, सीतामढी 144, लखीसराय 128, अररिया 127, अरवल 110, शिवहर 92 आणि जमुई जिल्ह्यातील 83 जणांचा समावेश आहे.