ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. बिहारमध्ये मागील 24 तासात 1 हजार 498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 52 हजार 192 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 1,702 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर बिहारमधील एकूण 1,52,192 रुग्णांपैकी आता पर्यंत 1 लाख 35 हजार 791 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 89.22 % आहे. तर आतापर्यंत 755 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 44 लाख 50 हजार 714 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 15 हजार 626 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.