ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये मागील 24 तासात 746 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 20 हजार 992 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील एकूण 2,20,992 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 12 हजार 911 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 96.34 % आहे. तर आतापर्यंत 1, 129 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 6,951 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 17 लाख 38 हजार 124 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 6 हजार 951 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.