ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बेला इथं कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला. यामुळे किमान ६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षकांसह अधिकारी दाखल झालेत. तर अजून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बॉयलर फुटल्यानंतर जवळपास ५ किमी परिसरात त्याचा आवाज ऐकू गेला असल्याचं सांगितलं जात आहे.