ऑनलाईन टीम / पटना :
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये 12 प्रचार सभा घेणार आहेत. भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली.
बिहारमध्ये 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदींनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. 23 ऑक्टोबरपासून मोदी बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत.
23 ऑक्टोबरला सासाराम, गया व भागलपूर, 28 ऑक्टोबरला दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटणा, 1 नोव्हेंबरला छपरा, पूर्व चंपारण्य व समस्तीपूर तर 3 नोव्हेंबरला पश्चिम चंपारण्य, सहरसा आणि फारबीसगंजला मोदींच्या प्रचार सभा होतील.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे.28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 71 मतदारसंघात मतदान होईल. 3 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात 94 तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यात 78 मतदारसंघात मतदान होणार आहे. 10 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.