प्रवक्ते उदय सामंत यांचा विश्वास
प्रतिनिधी/ रत्नागिरी
बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेच्या 20 स्टार प्रचारकांची नावे आज जाहीर केली गेली. 50 जागांपैकी जास्तीत-जास्त जागा निवडणूक आणण्यासाठी हे स्टार प्रचारक नक्की प्रयत्न करणार, असा विश्वास शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी व्यक्त केला.
बिहारमध्येही शिवसेनेचे मोठ अस्तित्व आहे हे या निवडणुकीत सिद्ध होईल, असे मत सामंत यांनी व्यक्त केले आहे. स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली म्हणजेच शिवसेना निवडणूक लढवणार, हे नक्की झाल्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
ग्रंथालये आठवडाभरात सुरु होतील
ग्रंथालयासंदर्भात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याशी फोनवर सकारात्मक चर्चा झाली. येत्या 8 दिवसांत वाचनालये सुरु करण्याचे आाश्वासन आपण त्यांना दिले आहे. राज ठाकरे यांनी ग्रंथालय शिष्टमंडळाच्या भावना आपल्यापर्यंत पोचवल्या. पुण्याच्या दौऱयावर असताना ग्रंथालये सुरु करण्यासंदर्भात नोट मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु आहे. ग्रंथालयाच्या कर्मचाऱयांवर व वाचकांवर अन्याय होणार नाही, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.