ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये मागील 24 तासात 1,018 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 15 हजार 964 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील एकूण 2,15,964 रुग्णांपैकी आता पर्यंत 1 लाख 93 हजार 789 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 94.47 % आहे. तर आतापर्यंत एक हजार पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 9,502 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 92 लाख 48 हजार 652 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 09 हजार 502 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.