मुंगेर : बिहारच्या मुंगेर येथे मन हादरवून टाकणारा प्रकार घडला आहे. तेथे एका 8 वर्षीय दुसरीत शिकत असलेल्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. याचबरोबर मुलीचा एक डोळा फोडण्यात आला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आह. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास हाती घेतला आहे. मुंगेर जिल्हय़ातील सफियाबाद येथील मुलीसोबत हा निर्घृण प्रकार घडला आहे. या मुलीचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. गुन्हय़ाचे पुरावे नष्ट करण्यासाठी गुन्हेगारांनी मुलीची निर्घृण हत्या केली आहे. मुलीचा उजवा डोळाही फोडण्यात आला तसेच दोन्ही हातांची बोटं ठेचण्यात आल्याचे आढळून आले आहे. बुधवारी दुपारी ही मुलगी स्वतःच्या वडिलांसोबत गंगा घाटावर गेली होती. वडिलांनी तिला घरी पाठवून मासेमारी सुरू केली होती. मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला आहे.
Previous Articleहिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार तमन्ना भाटिया
Next Article कराडची एकूण रूग्ण संख्या 35 हजारांवर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.