ऑनलाईन टीम / मुजफ्फरपूर :
बिहारच्या मुजफ्फरपूरमधील डकरामा गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या गावातून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या गावातील तीन महिलांना जमावाने विवस्त्र करून मारल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुजफ्फरपूरमधील डकरामा गावातील तीन महिलांवर गावातील लोकांनी काळी जादू करत असल्याचा आरोप ठेवून या महिलांना बेदम मारहाण केली व त्यानंतर त्यांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. तसेच गावातील लोक त्यांना डायन देखील म्हणत आहेत. याचा अनेक लोकांनी व्हिडिओ काढला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस आणि दखल घेत, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
याबाबत माहिती देताना मुजफ्फरपूर चे पोलीस अधिकारी कुंदन कुमार यांनी सांगितले की, हा एक गुन्हा आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल.