ऑनलाईन टीम / पटना :
बिहारमधील रक्सौल मतदार संघातील भाजपचे उमेदवार प्रमोदकुमार सिन्हा यांच्या भावाच्या घरातून 22 किलो सोने आणि 2 किलो चांदी नेपाळ पोलिसांनी जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोदकुमार सिन्हा यांचे भाऊ अशोक सिन्हा रक्सौलच्या शेजारी असलेल्या परसा जिल्ह्यात राहतात. प्रमोदकुमार यांनी 3 कोटी रुपये देऊन भाजपची उमेदवारी मिळवल्याची चर्चा होती. नेपाळी व्यापारी त्यांना पैसे पुरवत असल्याची चर्चा होती. त्यामुळे नेपाळ पोलिसांनी नेपाळमधील त्यांचे भाऊ अशोक यांच्या रेशीमकोठीस्थित गणेश अपार्टमेंटमधील घरावर गुप्तपणे छापेमारी केली. छापेमारी दरम्यान अशोक यांचे घर बंद होते. पोलिसांनी दरवाजाचे लॉक तोडून छापेमारी केली.
या छापेमारीत पोलिसांना 22 किलो 576 ग्रॅम सोन्याची बिस्किटे, दागिने आणि 2 किलो 263 ग्रॅम चांदी आढळून आली. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला आहे.