ऑनलाईन टीम / मुंगेर :
बिहारमधील मुंगेर भागातून एक मोठी घटना समोर आली आहे. माहितीनुसार भाजपचे प्रवक्ते डॉ. अजफर शमशी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळी मारण्यात आली. ही घटना साधारण 11.27 च्या सुमारास घडली.
शमशी यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून लवकरच त्यांना पुढील उपचारासाठी पटण्याला नेण्याची शक्यता आहे.
शमशी यांना एक गोळी लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी आरोपींना लवकरात लवकर लवकर अटक करण्याची मगणी केली आहे.
शमशी हे प्रोफेसर आहेत. घटनेच्या वेळी ते आपल्या गाडीने कासाठी जात होते. कॉलेजमध्ये पोहोचताच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी तिथेच पार्क करण्यास सांगितले. त्याच वेळी दोन गोळ्या झाडल्या. त्याबरोबरच शमशी हे जमिनीवरच कोसळले. दोन पैकी एक गोळी शमशी यांना लागली. घटनास्थळी पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.