ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मागील चोवीस तासात 18 नव्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची संख्या 767 वर पोहचली आहे, अशी माहिती बिहारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या 18 मधील 5 रुग्ण हे खगडिया मधील, 9 जण हे बेगुसराय जिल्ह्यातील, 2 जण दरभंगा मधील, बाका आणि सुपैलो जिल्ह्यातील प्रत्येकी एक जण आहे.
बेगूसराय मधील सर्व नवीन रुग्ण हे बिहारचे प्रवासी मजदुर आहेत. यातील तीन जण हे दिल्लीतून, तीन जण सुरतमधून, एक जण गाजियाबादमधून, एक जण गुजरातमधून तर एक जण कोलकातामधून बिहारमध्ये आला आहे.
दरम्यान, बिहारमध्ये आता पर्यंत 378 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत बिहारमध्ये 34 हजार 662 जणांची चाचणी करण्यात आली आहे.