ऑनलाईन टीम / पटना :
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जदयू-भाजपचे जागावाटप जाहीर झाले आहे. जनता दल युनायटेड 122 तर भाजप 121 जागांवर निवडणूक लढवणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा केली.
बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. जदयू आणि भाजपने या निवडणुकीसाठी युती केली आहे. जदयू 122 जागांमधील 7 जागा हिंदुस्थानी अवाम मोर्चाला देणार आहे. तर भाजप आपल्या 121 जागांपैकी 9 जागा या विकासशील इन्सान पार्टीला देणार आहे.
दरम्यान, ‘महागठबंधन’मधीलही जागावाटप झाले आहे.आरजेडी 144, काँग्रेस 70 आणि डावे 29 जागांवर निवडणूक लढवणार आहेत.