ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच आता समस्तीपूर जिल्ह्यातील सिव्हील सर्जन आर. आर. झा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
याबाबत समस्तीपूर जिल्ह्याचे जिल्हा संपर्क अधिकारी ऋषभ कुमार यांनी सांगितले की, आज सकाळी सात वाजता पाटणा मधील एम्स रुग्णालयात डॉ. झा यांचे निधन झाले. पुढे ते म्हणाले, 13 जुलै रोजी डॉ. झा यांनी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पाटणा मधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान डॉ. झा यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, याआधी मंगळवारी बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एमएलसी सुनील कुमार सिंह यांचे अचानक हार्ट अटॅक आल्याने निधन झाले. त्यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.