बंगळूर/ प्रतिनिधी
50 वर्ष वयावरील बीएमटीसी कर्मचाऱयांमध्ये काही आजारानी ग्रस्त असणाऱया कर्मचाऱयांमध्ये सर्व वाहक, चालक, यांना रजेवर पाठविण्यात आले आहे. याचदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दाखला देत बीएमटीसीने एक परिपत्रक सादर केले आहे. यामध्ये श्वसनाची समस्या, हृदयासंबंधी त्रास, मधुमेह आणि मुत्रपिंडाचा त्रास असणाऱया 50 वयापेक्षा अधिक वय असणाऱया कर्मचाऱयांनी आपल्या रजेचा सदुपयोग आपल्या खात्यासाठी करु शकतात. प्रशिक्षणार्थी कर्मचाऱयांना रजा उपलब्ध होत नसल्यास त्यांना विना भत्ता रजा देता येणार आहे. तर कायमस्वरुपी कार्यरत असणाऱया कर्मचाऱयांना रजा मिळत नसल्यास त्यांच्या आरोग्याची तपासणी करुन त्यांची रजा मंजुर किंवा ना मंजूर करावी. असे निर्देश प्रशासनाकडून दिले आहेत.