बस सेवेला फटका बसणार नाही
बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) मध्ये कार्यरत असणाऱ्या काही कामगार संघटना सरकारकडून होणाऱ्या वेतन दिरंगाईबद्दल आज निषेध करणार आहेत. तसेच प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करणार आहेत.
मात्र, निषेधाच्या वेळी बससेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे परिवहन महामंडळांचे म्हणणे आहे. बुधवारी वेतन दिरंगाईबाबत बीएमटीसी व्यवस्थापनाला निवेदन देण्यासाठी काही संघटना मध्यवर्ती कार्यालयात येणार आहेत. तथापि, बुधवारी बीएमटीसी बसचे कामकाज सामान्य होईल, असे बीएमटीसीच्या पीआरओने एका निवेदनात म्हटले आहे.
या निषेधावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दोन दिवसांत सर्व वाहनचालक व कंडक्टर यांचे वेतन मंजूर होईल, असा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.