बेंगळूर/प्रतिनिधी
बीएमटीसी कर्मचाऱ्यांचा संप हळूहळू कमकुवत होत आहे. काही कर्मचारी कर्तव्यावर परत येत आहेत. गेल्या तीन दिवसांत बीएमटीसी बसचे कामकाज जवळपास दुप्पट झाले आहे. बीएमटीसीचे प्रवक्ते अजित तोरगल यांनी सांगितले की, १६ एप्रिल रोजी बीएमटीसीने ८७३ बसेस चालवल्या. १७ एप्रिल रोजी १५५ आणि १८ एप्रिल १,४०६ बसेस चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यन संपात सहभागी असलेले काही कर्मचारी निलंबन आदेश रद्द करण्याच्या व बडतर्फ आदेशाबाबत बनावट संदेश पसरवत होते. शासन स्तरावर पालिकेने अशी कोणतीही तरतूद किंवा आदेश जारी केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संपाला उत्तेजन देणाऱ्या आणि कर्तव्यांपासून गैरहजेरी असलेल्यांवर बीएमटीसी कडक कारवाई करत असल्याची माहिती त्यांनी दिली. निलंबन किंवा बडतर्फ़ केल्यानंतर बर्याच कर्मचार्यांनी युनियनच्या भीतीमुळे ते कामावर आले नसल्याचे कळवले आहे. याची पुन्हा एकदा खात्री झाली. कामावर परत आलेल्या कर्मचार्यांना पुरेसे पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे.