3.5 सेंकदामध्ये 100 किमीचा घेणार वेग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लक्झरी कार बनविणारी कंपनी बीएमडब्लू यांच्याकडून एम 4 कम्पिटीशन कूप मॉडेल सादर करण्यात आले आहे. सदरच्या लक्झरी कारचा लूक हा अत्यंत आकर्षक असाच आहे.
कंपनीने या कारला भारतीय बाजारात 1.43 कोटी रुपयामध्ये सादर केले आहे. सदरच्या कारमध्ये वेगवेगळी फिचर्स दिली असून ही गाडी फक्त 3.5 सेकंदात 100 किमी/तासाला इतका जबरदस्त टॉप स्पीड घेऊ शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
फिचर्स
? लेजरलाइटसोबत ऍडजस्टेबल हेडलाइट्स सुविधा
?बीएमडब्लू एम 4 कॉम्पिटीशन एक्सड्राईव्हवर स्टॅण्डर्ड फिटमेंटच्या रुपात येणार
?कार्बन-फायबर रफ्ड प्लास्टिकमधून एरोडायनेमिकली कस्टमाइज फिन
?गाडीच्या आतमध्ये 12.3 इंच आकाराची स्क्रीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह 10.25 इंचचा टचस्क्रीन इफोटेनमेंट सिस्टमची सोय
?ड्राईव्ह नियंत्रणासोबत स्टीयरिंग व्हील, वॉयल नियंत्रणवर मल्टीफंक्शन बटनची सुविधा