नवी दिल्ली
जर्मनीतील लक्झरी कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूने मिनी ब्रँडअंतर्गत भारतीय बाजारात तीन नव्या कार्स मंगळवारी दाखल केल्या आहेत. बीएमडब्ल्यू या प्रतिष्ठीत कंपनीने आपली नवी मिनी 3 डोअर हॅच ही कार दाखल केली जिची किंमत 38 लाख रुपये असणार असून मिनी कन्वर्टीबलची किंमत 44 लाख रुपये असणार आहे. तर मिनी जॉन कूपर वर्क्स हॅच गाडीची किंमत 46 लाखाच्या घरात असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.