नवी दिल्ली
लक्झरी कार्सच्या निर्मितीमध्ये लक्ष घालणाऱया बीएमडब्ल्यू कंपनीने नुकत्याच आपल्या 2 बाईक्स भारतीय बाजारात उतरवल्या आहेत. जी 310 आर आणि 310 जीएस या दोन नव्या बाईक्स जर्मनीतील कंपनी बीएमडब्ल्यूने सादर केल्या आहेत. त्यांच्या किमती 2.45 आणि 2.85 लाख रुपये असणार आहेत. 313 सीसीच्या या बाईक्सचा विकास जर्मनीत म्युनिच येथे केला गेला आहे. पण भारतातील होसूर येथे सहयोगी कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने या गाडय़ा बनवल्या आहेत, असे समजते.