बर्लीन
जर्मनीची लक्झरी कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यू 2009 नंतर पहिल्यांदा नुकसानीत आली आहे. कोरोनामुळे कारच्या विक्रीत घट झाली आहे. कंपनीला 666 दशलक्ष युरोचा (787.6 दशलक्ष डॉलर) तोटा झाला आहे. 2019 मध्ये नफा 2.1 अब्ज युरो इतका झाला होता. वर्षाच्या तुलनेत 25 टक्के कमी कार्स विकल्या गेल्या आहेत. कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊनचा अवलंब केला जात असून त्याचा परिणाम गाडय़ांच्या मागणीवर दिसत आहे. तसेच दुसरी कोरोनाची लाट येण्याची भीतीही असून ग्राहक खरेदीपासून लांब राहात आहेत. पुढच्या 6 महिन्यात स्थिती सुधारण्याची कंपनीला आशा असून त्यावेळी विक्री पुन्हा गती घेईल, असा विश्वास बीएमडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी ओलीव्हर झिप्स यांनी सांगितले.