बेळगाव : बीएसएनएलच्या कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल कर्मचाऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. बीएसएनएलला 4 जी सुरुवात करण्यास आणि 5 जी सेवा तयार करण्यास, ग्लोबल विक्रेत्यांकडून उपकरणे खरेदी करण्यास परवानगी द्यावी, निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शन सुरळीत करावी, कर्मचाऱयांचे वेतनही वेळेत द्यावे या मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाऱयांनी आंदोलन छेडले.
याप्रसंगी वाय. आर. हंचीनमनी, एन. पी. इनामदार, ए. एच. चवळी, मुलीमनी, चौगुले यांसह जिल्हा संयोजक अरविंद कौलगे, पांडुरंग नायक यांच्यासह विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते.