क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित एसपी घाळी चषक सोळा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात बीएससी डेपो टायगर्स संघाने स्पार्टन संघाचा 6 गडय़ांनी तर सुपर किंग्ज संघाने रायकर वॉरियर्स संघाचा 25 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. वेदांत पाटील (बीएससी), मनिकांत बुकिटगार (सुपर किंग्ज) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बीएससी संघाने स्पार्टन संघाचा 6 गडय़ांनी पराभव केला. स्पार्टन संघाने 25 षटकात 9 बाद 96 धावा केल्या. त्यात शुभम खोतने 27 सुमित भोसलेने 13, मोहिद सय्यदने 12 धावा केल्या. बीएससी टायगर्सतर्फे वेदांत पाटीलने 4, अथर्वने 1 गडी बाद केला. प्रत्त्युत्तरादाखल खेळताना बीएससी संघाने 18 षटकात 4 बाद 97 धावा करुन सामना जिंकला. तनुष धुमाळेने 36 तर आकाश कुलकर्णीने 14 धावा केल्या. स्पार्टनतर्फे मोहिद सय्यदने 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात सुपर किंग्ज संघाने रायकर वॉरियर्सचा 25 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सुपर किंग्ज संघाने 25 षटकात 7 बाद 169 धावा केल्या. त्यात मनिकांत बुकीटगारने 2 षटकार आणि 6 चौकारांसह 65, शहाबाद जमखंडीने 18 धावा केल्या. रायकर वॉरियर्सतर्फे वैष्णवने 3 गडी बाद केले. प्रत्त्युत्तरादाखल खेळताना रायकर वॉरियर्स संघाने 25 षटकात 144 धावाच केल्या. त्यात सिद्धांत यादवने सर्वाधिक 49, अभिषेक निकमने 25 तर उत्कर्ष शिंदेने 22 धावा केल्या. सुपर किंग्जतर्फे आदित्य दंगनावरने 3 तर मनिकांत व रोहित यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे निलिमा के., अर्चना कुलकर्णी व गणपत पाटील यांच्या हस्ते सामनावीर मनिकांत बुकीटगार व इम्पॅक्ट खेळाडू सिद्धांत यादव यांना चषक देऊन गौरविण्यात आले. दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे चिदंबर मडिवाळर, प्रताप नलवडे व आरिफ बाळेकुंद्री यांच्या हस्ते सामनावीर वेदांत पाटील व इम्पॅक्ट खेळाडू तनुष धुमाळे यांना चषक देऊन गौरविण्यात आले.