नवी दिल्ली
जापानी कंपनी होंडाने बीएस -6 श्रेणीतील नवी ग्रेझीया ही स्कुटर स्टँडर्ड व डिलक्स या प्रकारात नुकतीच बाजारात उतरवली आहे. बी एस- 4 श्रेणीतील गाडीच्या तुलनेत या नव्या गाडीची किंमत काही हजाराने वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आकर्षक लूक व दमदार इंजिन क्षमता असणाऱया या गाडीची सुरुवातीची किंमत 73 हजार 336 रु. असेल. याच आठवडय़ात या गाडीचे वितरण केले जाईल. मॅटे सायबर यलो, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल सायरन ब्ल्यू व मॅटे ऍक्सीस ग्रे या रंगात या गाडय़ा विक्रीसाठी उपलब्ध असतील.