ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमध्ये बुधवारी नवे 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असून, बीजिंग शहारातील 30 रहिवासी कॉलनी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्या आहेत. तसेच बीजिंगच्या विमानतळावरून होणारी 1255 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
चीनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंदाजे 10 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीजिंगच्या विमानतळावरून होणारी 1255 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बीजिंगमधील झिनफादी होलसेल मार्केटमधून कोरोनाचा संसर्ग पुन्हा झाल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे शहरातील धोक्याच्या ठिकाणी रहिवाशांना प्रवासाची बंदी घालण्यात आली आहे. तर बीजिंग शहर सोडून जाण्यापूर्वी न्यूक्लिक ॲसिड टेस्ट करणे गरजेचे असणार आहे.
कोरोनामुळे बीजिंगमधील 11 बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. चीनमध्ये सुरू करण्यात आलेल्या काही भागातील शाळा आता पुन्हा बंद करण्यात आल्या असून ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले आहेत.