बेंगळूर : बेंगळूरच्या यशवंतपूर विधानसभा मतदारसंघात बीजीएस ग्लोबल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स ऍन्ड हॉस्पिटल संस्थेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या नूतन कोविड केअर सेंटरचे सोमवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. केंगेरीच्या उत्तरहळ्ळी मुख्य रोडवरील बीजीएस मेडिकल कॉलेजमध्ये कोविड सेंटर सुरू झाले असून या सुसज्जित व्यवस्थेबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या सेंटरमध्ये 210 ऑक्सिजन बेड, 23 व्हेंटिलेटर, सुविधा असणारे 43 बेड, 30 एचडीयु बेड आणि 100 सामान्य बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
Next Article ‘आधार’ नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लवकरच लसीकरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.