ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
बीडच्या अंबाजोगाईमधील एका दाम्पत्याची अमेरिकेच्या न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथे एका अपार्टंमेंटमध्ये चाकूने भासकून हत्या करण्यात आली आहे. बालाजी भारत रुद्रावार (वय 32) आणि आरती बालाजी रुद्रावार अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी रुदावार हे मुळचे बीडच्या आंबाजोगाईचे आहेत. ते आयटी कंपनीत कामाला असल्याने 2015 मध्ये ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. आरती या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. गुरुवारी या दाम्पत्यावर चाकूहल्ला झाला. या दाम्पत्याची मुलगी बाल्कनीत उभी राहून रडत असल्याने शेजाऱ्यांनी विचारपूस केली. त्यानंतर घडलेला प्रकार समोर आला. वैद्यकीय तपासात या दाम्पत्याला चाकूने भोसकल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून, हे मृतदेह भारतात येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतील, असे अमेरिकन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.