ऑनलाईन टीम / बीड :
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहण्यास मिळाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याने सरपंच पांडुरंग यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाण करणारे कार्यकर्ते हे धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याचा आरोप पांडुरंग नागरगौजे यांनी केला आहे.