क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बीडीके ए ने अमृत पोतदार सीसीआयचा 6 गडय़ांनी, एसडीएमसीए धारवाड ब संघाने बीडीके फौंडेशन सी संघाचा तर हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने नीना स्पोर्ट्स संघाचा 199 धावानी पराभव केला.
हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने 50 षटकात 6 बाद 354 धावा केल्या. सुधन्वा कुलकर्णीने 100, राहुल रावतने 121 धावा करून दोघांनीही शतक झळकविले. धृव नाईकने 42, चिराग नायकने 23 तर प्रणव भाटीयाने 14 धावा केल्या. नीनातर्फे प्रशांत मुतकेकरने 2, धृव नायक, संतोष सुळगे पाटील, माजीद मकानदार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना संघाचा डाव 41.1 षटकात सर्व बाद 155 धावात आटोपला. संतोष सुळगे पाटीलने 77, धृव नाईकने 25 धावा केल्या. हुबळीतर्फे रोहितकुमार ए. सी.ने 22 धावात 4, प्रणव भाटीयाने 3, अक्षय पत्तारने 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात एसडीएम क्रिकेट अकादमी ब संघाने 43.4 षटकात सर्व बाद 271 धावा केल्या. रक्षित कुलकर्णीने 81, हबीब ताडपत्रिने 60, सम्यक पाटीलने 36, आदित्य व्ही. एच.ने 31 धावा केल्या. बीडीके सी तर्फे पवनकुमार जी ने 3 तर भाविरतने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके सी संघाचा डाव 42 षटकात सर्व बाद 171 धावात आटोपला. प्रियंजनने 33, अब्दुल करिम डी.ने 44, श्रीकाकाने 30 धावा केल्या. एसडीएमतर्फे शाबाजने 3, दुष्यंत व सुनील कुरी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तिसऱया सामन्यात अमृत पोतदार सीसीआय संघाने 37 षटकात सर्व बाद 118 धावा केल्या. स्वप्निल एळवेने 45 तर पुरूषोत्तमने 19 धावा केल्या. बीडीके ए तर्फे हार्दिक ओझाने 3, साहिल सावडा, फरान पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके अ संघाने 19.5 षटकात 4 बाद 116 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. प्रथमेश आर.ने 35, सार्थक गुंजाळने 23, अमर घाळीने 15 धावा केल्या. सीसीआयतर्फे सुशांत कोवाडकरने 4 गडी बाद केले.